उन्हाळ्यात काकडी खाण्याचे फायदे जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्यात काकडीचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. सध्या कडक उन्हाची झळ दिवसेंदिवस अती तीव्र होत आहे. यामुळे कडक उन्हाळ्यात भरपूर काकड्या खाणे फायदेशीर ठरते. या दिवसांत बाजारात काकड्या मुबलक प्रमाणात आणि सहज विकत मिळतात. काकडी खाल्ल्याने अनेक शारीरिक फायदे होतात. यामुळे हाडे मजबूत राहण्याबरोबरच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याकरिता काकडी खाणे महत्त्वाचे आहे. याशिवाय काकडी खाण्याचे इतर कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया.

– बदलत्या जीवनशैलीमुळे हाडे दुखणे, ठिसूळ होणे अशा प्रकारचे त्रास बऱ्याच जणांना होतात. अशी तक्रार असणाऱ्यांनी उन्हाळ्यात काकडीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. काकडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

– त्वचा आणि केसांसाठीही काकडी अतिशय गुणकारी उपयुक्त आहे. काकडी खाल्ल्याने केसांची वाढ चांगली होते आणि त्वचा चमकदार होते.

– बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका होण्यासाठी काकडी खूप फायदेशीर आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आहारात काकडीचा समावेश जरूर करा.

– रक्तदाब संतुलित ठेवण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठीही काकडी फायदेशीर आहे. यासाठी कच्ची काकडी किंवा काकडीची कोशिंबीर, वड्या असे विविध तऱ्हेचे पदार्थ बनवून काकडीचा आहारात समावेश करता येऊ शकतो.

– वजन कमी करण्यासोबतच किडनीच्या समस्यांवरही काकडी उपयुक्त आहे. वजन कमी करायचे असेल तर आहारात काकडीचा समावेश जरूर करा. काकडीत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. काकडी खाल्ल्याने शरीरातील युरिक ऍसिड आणि मूत्रपिंडातील अशुद्धी दूर होते.