नवाब मलिक यांना अटक, आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली आहे.

तत्पूर्वी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणी चौकशी करण्यात आली. सकाळी पाच वाजल्यापासून नवाब मलिक यांची चौकशी सुरू होती. मलिक यांना दुपारच्या सुमारास अटक करण्यात आल्यानंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)


राष्ट्रवादी आक्रमक

नवाब मलिक यांना चौकशीला नेत्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी नवाब मलिक हे केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांविषयी परखडपणे बोलत असतात. त्यामुळे त्यांच्यावर आज किंवा उद्या अशी कारवाई होणार, याची आम्हाला खात्रीच होती असे म्हटले आहे.

नवाब मलिक यांची ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशी; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…