इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर, 10 ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंजिनीयरिंग अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी सीईटी सेलने जाहीर केली असून पीसीएम गटात (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) 100 टक्के पर्सेंटाइल मिळविलेल्या 13 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांचा या यादीत समावेश झाला आहे. अर्ज केलेल्या 1 लाख 23 हजार 87 विद्यार्थ्यांना तात्पुरत्या गुणवत्ता यादीत स्थान देण्यात आले आहे. यामध्ये पदविका पूर्ण करुन प्रथम वर्षात प्रवेश घेणारे तब्बल 660 विद्यार्थी आहेत.

राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी 1 लाख 28 हजार 124 जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी पहिल्या पॅप राऊंडपर्यंत अर्ज करणाऱयांना 4 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. राज्यभरातून 1 लाख 29 हजार 605 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. विविध पेंद्रीय कोटय़ातील विद्यार्थी वगळून 1 लाख 23 हजार 087 विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत पीसीएममध्ये 100 टक्के पर्सेंटाइल गुण 13 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांचा यादीत समावेश आहेत. हे विद्यार्थी यादीत पहिल्या तीन मेरिट क्रमांकावर आहेत. विद्यार्थ्यांना या यादीविषयी हरकती व सूचना असल्यास 10 ऑक्टोबरपर्यंत नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी गुणवत्ता यादी आणि पॅप राऊंडसाठी सीट मॅट्रिक्स जाहीर केले जाणार आहे. 13 ते 15 ऑक्टोबर हे दोन दिवस विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि स्ट्रीम पसंतीक्रम द्यावयाचा आहे. 18 ऑक्टोबर रोजी पहिला पॅप राऊंड जाहीर होणार आहे.