पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, इंग्लंडच्या नवख्या संघाने विजय मिळवत मालिकेत घेतली आघाडी

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाला पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पाकिस्तानी संघाला इंग्लंडने अवघ्या 141 धावात गुंडाळलं. इंग्लंडने हे आव्हान अवघ्या 35.2 षटकांत पूर्ण केलं. विशेष बाब ही आहे की इंग्लंडच्या संघातील 3 क्रिकेटपटू आणि 4 स्टाफ सदस्यांना कोरोना झाल्याचं कळाल्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने मंगळवारी नवा संघ जाहीर केला होता. 18 सदस्यांच्या या संघात 9 क्रिकेटपटू हे नवखे आहेत.

इंग्लंडच्या नवख्या संघाला पाकिस्तानी संघ सहज लोळवू शकेल अशा आसा तिथल्या क्रिकेट समीक्षकांनी व्यक्त केल्या होत्या. मात्र या सामन्यात उलट चित्र पाहायला मिळालं. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट याचा बळी टीपण्यात पाकिस्तानी गोलंदाजांना यश आलं. त्याच्यानंतर एकही बळी पाकिस्तानला टीपता आला नाही. डेव्हीड मलान याने 68 आणि जॅक क्रॉलीने 58 धावा करत संघाला सहजपणे विजय मिळवून दिला. पाकिस्तानने दिलेले आव्हान इंग्लंडने 21.5 षटकांत पूर्ण केले.

इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाचा डाव अवघ्या 35.2 षटकांत संपवला. इमाम उल हक आणि बाबर आझम हे मोठी धावसंख्या उभारून देण्यासाठी प्रसिद्ध असल्याचं बोललं जातं, या दोघांनाही अवघा 5 वा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या शादीक मेहमूदने शून्यावर बाद केलं.

आपली प्रतिक्रिया द्या