गोविंदा आला रे…नवीन गाणे प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या दमदार अभिनयासोबत दिलखेचक नृत्यामुळे अभिनेता गोविंदा नेहमीच चर्चेत असतो. आता गोविंदाच्या दमदार नृत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ’गोविंदा रॉयल्स’ या यूटय़ूब चॅनेलवर ’प्रेम करू छू’ हे नवीन सिंगल त्याने नुकतेच रिलीज केले आहे. हे बहुभाषिक गाणे असून गोविंदाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.याबाबत गोविंदा म्हणाला, ‘‘माझे संगीतावरील प्रेम जगभरातील चाहत्यांसोबत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर करण्यास मी सज्ज झालो आहे. गणेश आचार्य यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले असून प्रेक्षकांना उर्जा अनुभवता येणार आहे.’’