
मूळची दिल्लीची असलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने दिल्लीपेक्षा मुंबई ही खूप सुरक्षित असल्याचं म्हटलंय. दिल्लीच्या तुलनेत मुंबईमध्ये महिला अधिक सुरक्षित असल्याचे सान्याचे म्हणणं आहे. दिल्लीत अशी एकही महिला नसेल जिने छेडछाडीचा सामना केला नसेल, असे सान्याने सांगितले. दिल्ली आता किती सुधारलीय माहिती नाही. मात्र, मला दिल्लीत अजिबात सुरक्षित वाटायचे नाही असेही सान्या म्हणाली.
























































