
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी कोविड पॉझिटिव्ह झाल्याचं सांगत, सर्वांनी मास्क घालून योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही काळजी घेण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021






























































