
पाकिस्तानच्या डेरा गाझी खान भागात शुक्रवारी स्फोटासारखा आवाज आला. हे ठिकाण अंत्यत संवेदनशील असून पाकिस्तान सरकारचा अणुऊर्जा आयोगाचा विभाग या भागात आहे. इंडिया टुडेनं हे वृत्तप्रसिद्ध केलं असलं तरी याची ठिकाणाबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.
घटनास्थळापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरापर्यंत या ‘स्फोटाचा’ प्रभाव जाणवल्याची माहिती मिळते आहे.
काही तासांपूर्वीच बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा येथे दोन आत्मघाती स्फोट झाल्यानंतर हे घडले. या दुहेरी बॉम्बस्फोटात 65 जणांचा मृत्यू झाला होता.
बलुचिस्तानमध्ये, बॉम्बरने प्रेषित मोहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त मिरवणुकीसाठी लोक जमलेले असताना पोलिसांच्या वाहनाजवळ स्फोट झाला. खैबर पख्तूनख्वामध्येही मशिदीत स्फोट झाला.

























































