
फेसबुकवर भेटलेला मित्र दलित निघाल्यामुळे एका तरुणीने त्याला मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना नोएडा येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे.
ही घटना आनंदपूर गावात घडली आहे. दोन वर्षांपूर्वी येथील गौरव कुमार नावाच्या तरुणाची मैत्री फेसबुक वर रिंकीसोबत झाली होती. गौरवने फेसबुकवर गुर्जर समाजाचा असल्याची माहिती दिली होती. रिंकीने त्याच्याशी गुर्जर समाजाचा समजून मैत्री केली होती.
काही काळाने तिला गौरव हा दलित समाजाचा असल्याचं कळलं. त्यामुळे तिला संताप अनावर झाला. तिने त्याल भेटायला बोलवलं. गौरव भेटायला आल्यानंतर तिने नातेवाईकांच्या मदतीने त्याला बेदम मारहाण केली. त्याला विष पाजल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला. मृत्युपूर्वी या तरुणाने संपूर्ण जबाब चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी रिंकीसह तिच्या कुटुंबाला आणि अन्य पाच जण मिळून 9 जणांना अटक करण्यात आली आहे.



























































