फेसबुक, इन्स्टाग्राम,व्हॉट्सअॅप बंद पडल्याने युजर्सची गोची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया साइटस् सोमवारी रात्री अडीच वाजता बंद पडल्यामुळे युजर्सची मोठी गोची झाली. सुमारे एक तास या तीनही साइट बंद होत्या, अशी माहिती त्यांची देखभाल करणाऱया ‘डाऊनडिक्टेटर डॉट कॉम’ने दिली. नेटवर्क समस्येमुळे युजर्सना फेसबुकवर जाणे आणि पोस्ट करणे शक्य होत नव्हते. मात्र आता पूर्वीप्रमाणे सर्व साइटस् सुरू आहेत, अशी माहिती फेसबुकचे प्रवक्ते जे. नैनकैरो यांनी दिली.

युजर्स संतापले
फेसबुक बंद पडल्यामुळे युजर्स संतापले आणि त्यांनी ‘फेसबुकडाऊन’ अशा हॅशटॅगने ट्विटरच्या माध्यमातून ट्रोल केले. फेसबुक बंद, इन्स्टाग्राम बंद आहे. आता ट्विटर आणि स्नॅपचॅटलाही बंद करण्याची गरज आहे. आपण पुन्हा 90च्या दशकात आलो आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या.

summary : Facebook, Instagram and Whatsapp stop working across the world