घरफोडी करणाऱ्या सराईत महिलांना अटक, फरासखाना पोलिसांची कामगिरी

प्रातिनिधिक फोटो

घरफोडी करणाऱ्या दोन सराईत महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 25 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चोरट्या महिलांनी बुधवार पेठेतील पालेकर वाड्यातून दागिन्यांची चोरी केली होती. रेश्मा रज्जाक शेख (रा. मंगळवार पेठ) आणि अनिता नारायण हजारे (रा.कामगार पुतळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रूपाली कोकरे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी रूपाली कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी महिला चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 25 हजारांचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी सीसीटीव्ही पुâटेजनुसार चोरट्यांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी घरफोडी करणाNया दोन सराईत महिला असल्याची माहिती पोलीस अमंलदार अभिनय चौधरी, ऋषिकेश दिघे आणि हनीफ शौकत शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रेश्मा आणि अनिताला मंगळवार पेठेतील गाडीतळ परिसरातून ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. फरासखाना पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये गुन्ह्याची उकल केल्यामुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, रिजवान जिनेडी, मेहबूब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, अमोल सरडे, महावीर वलटे, महंमद हनीफ, शौकत शेख, मोहन दळवी, सचिन सरपाले, आकाश वाल्मिकी, राकेश क्षीरसागर, मयूर भोकरे, अभिनय चौधरी, ऋषीकेश दिघे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या