लातूरमध्ये तरुण शेतकर्‍याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरुर अनंतपाळ

येथुन जवळच असलेल्या मौजे डोंगरगाव (बो.) येथील तरुण शेतकरी बळीराम लिंबराज मोहिते यांचा विजेचा धक्का लागल्याचे जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी ९ वाजता घडली.

शेतकरी बळीराम लिंबराज मोहिते (वय २८) यांचा गावाशेजारील दक्षिण बाजुस असलेल्या महावितरणच्या विद्युत प्रवाह चालू असलेल्या डिपीतील करंट लागल्याने जागीच मृत्यु झाला आहे. घटनास्थळी महावितरण व पोलीस पोहचले नाहीत. संबंधीताना गावकर्‍यांनी कळवले असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या गावकर्‍यांनी दिली.

मृत बळीराम मोहिते यांना पत्नी, तीन मुली, एक मुलगा, एक भाऊ, आई – वडील असा परिवार आहे. मृताची पत्नी बाळंतपणासाठी माहेर जोगाळा येथे गेली असुन पंधरा दिवसाखाली चौथे अपत्य मुलगा झाला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.