फॅशन नववर्षातील

नव्या वर्षाचे संकल्प अनेकांनी खूप केले असतील. कुणी फॅशन लाइफ-स्टाइलबाबत काही संकल्प केलेत का? नव्या वर्षात काय असतील फॅशन ट्रेंड्स? स्टायलिंग कशा प्रकारे असू शकेल? कुठले रंग ‘इन’ असतील…

ग्लोबल फॅशनच्या बाबतीत फॅशन तज्ञ म्हणतात, अलीकडे म्हणजे गेली सात-आठ वर्षे रेट्रो म्हणजेच जुन्या फॅशन आणि स्टायलिंगने नव्या-जुन्या पिढीला भुरळ पाडलीये. दर 15-20 वर्षांनी फॅशनचा पुनर्जन्म होत असतो हे एक शाश्वत सत्य आहेच. ‘बॉबी’ सिनेमाला 50 वर्षे उलटून गेलीत तरी मिनी स्कर्टस् आणि पोलका डॉट्स या फॅशनची व्रेझ पुनः पुन्हा समोर येतेय. म्हणूनच ग्लोबली फॅशन डिझायनर म्हणतात, 90 च्या दशकातील फॅशन 2024 मध्ये पुन्हा दिसून येणार आहे. यात पोलो शर्ट, पॅज्युअल वेअर अगदी सहज दिसून येईल. कॉर्सेटची फॅशन यंदाही ट्रेंडिंग करेल. कॉर्सेट वेअर टीन एजर ते मध्यमवयीन आणि वयस्क अशा सर्व वयोगटांतील स्त्रियांसाठी ‘इन फॅशन’ या वर्षीही ठरणार आहे.

सर्वसामान्यांचा शाश्वत ट्रेंड
फॅशन डिझायनर किरण कदम सांगते, फॅशनबाबत अगदी ठामपणे अंदाज, भाकीत वर्तवणे शक्य नसते. पण मला खात्री आहे या वर्षी सर्वसामान्यांसाठी ‘सस्टेनेबल’ फॅशन ट्रेंड कायम असेल.

आता असे पहा, 2023 मध्ये पेन्सिल पँट्स अतिशय लोकप्रिय ठरल्यात म्हणून त्या आता म्हणजे 2024 मध्ये लगेच ‘आऊट ऑफ फॅशन’ ठरत नाहीत. पेन्सिल पँट्स याही वर्षी राहणार आहेत. फॅशनचा सर्वंकष विचार करताना ‘इको फ्रेंडली’ अर्थात पर्यावरणपूरक अशी फॅशन असावी याचे महत्त्व कायम असेल. सिंथेटिक फॅब्रिकदेखील ‘रिसायकल’ करून पुन्हा वापरण्याचा ट्रेंड असणार आहे. ‘रिसायकल’, ‘रियूझ’चे महत्त्व अबाधित असणार आहे. फॅशनच्या आधुनिक प्रणालीत अशा काही गार्मेंट्स उपयोग असेल जे वातावरणाला अनुरूप असे तापमान नियंत्रित करतील. अशा स्मार्ट फॅब्रिक्सवर फॅशनतज्ञ काम करत आहेत. नव्या टेक्नॉलॉजीचा साधक-बाधक विचार करून नवे आधुनिक आणि रेलेव्हंट फॅब्रिक्स यंदा सादर होण्याची शक्यता आहे.

नव्या युगाची फॅशन आता ‘जेंडर बेस्ड’ राहिली नसून स्त्राr-पुरुष हे दोघेही शर्टस्, जीन्स (डेनिम), ट्राऊजर्स, जॅकेट्स, बेल्ट्स, पायजमा-कुडता असे परिधान करताना आपण पाहतो. यंदादेखील हाच ट्रेंड पुढे कायम चालू राहील. रेट्रो फॅशनचा पुनर्जन्म नेहमीप्रमाणे नजरेत भरणार आहे. बोहेमियन प्रिंट्सचा बोलबालादेखील
कॉलेज युवक-युवतींमध्ये प्रामुख्याने दिसून येईल.