Rajkot – पैसे कमावण्यासाठी नीचपणाची हद्द, सासऱ्याने सुनेचे व्हिडीओ पॉर्नसाईटला विकले

गुजरातमधील राजकोटमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. राजकोटमधील एका हॉटेलच्या मालकाने पैशाच्या लालसेपोटी आपल्या सुनेचे खासगी व्हिडीओ एका पॉर्न साइटला विकले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विवाहितेचा पती , सासरा आणि सासूला अटक केली आहे. राजकोट पोलिसांनी, सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या 356 डी, आयटी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. सायबर क्राईम पोलिसांनी सुनेच्या खोलीत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे , सेक्स टॉय आणि काही कपडे जप्त केले आहेत. सुनेचे व्हिडीओ वेबसाईटवर पोहोचल्यावर सासऱ्याला त्या बदल्यात टोकन मिळत होते, जे हिंदुस्थानी चलनात रुपांतरीत करता येत होते. काही व्यवहार क्रिप्टोकरन्सीद्वारेही करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. झटपट पैसे कमावण्यासाठी राजकोटच्या या कुटुंबाने हे घाणेरडे कृत्य केले आहे.

ही संपूर्ण घटना राजकोटच्या भक्ती नगरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबात घडली आहे.  हे कुटुंब सधन असूनही त्यांना अधिकच्या पैशांची हाव लागली होती. पीडित महिलेच्या सासरच्यांनी नवरा बायकोचे खासगी क्षण सीसीटीव्ही लावून चित्रीत केले होते. यानंतरप त्यांनी हे व्हिडीओ पॉर्नसाईटवर विकले होते. पतीच्या घरच्यांचे हे कृत्य कळाल्यानंतर पीडितेला जबर धक्का बसला होता. पीडितेचे वय 21 वर्षे असून तिने सासरच्यांविरोधात लैंगिक शोषण , लैंगिक छळाची तक्रार केली आहे. आरोपी पती , सासरे आणि सासू तिला एका विशिष्ट वेबसाइटवर लाईव्ह सेक्स करण्यास भाग पाडत होते असा आरोपही या महिलेने केला आहे.. सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून तीनही आरोपींना अटक केली आहे.  सायबर क्राईम विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल रबारी यांनी सांगितले की, हे कुटुंब खूप सुखवस्तू आणि सधन आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार या कुटुंबाने पीडितेचे व्हिडीओ पॉर्नसाईटवर विकले होते आणि तिला लाईव्ह सेक्ससाठीही भाग पाडले होते. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबातील तीन सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधिकारी रबारी यांनी सांगितले की, एका साईटवर पीडितेला लाईव्ह सेक्ससाठी भाग पाडले जात होते.  या वेबसाइटमध्ये दर्शकांना कोणताही व्हिडिओ पाहताना टीप पाठवण्याचा पर्याय असतो. टीप पाठवण्यासाठी, वेबसाइटवर एक खाते तयार करणे आवश्यक आहे , ज्यावरून टोकन पाठवले जाते. हे टोकन क्रिप्टो चलनात असते. हे क्रिप्टोचलन रुपयामध्ये परावर्तित करता येते.

पोलिसांनाही धक्का बसला

राजकोटमधील सायबर क्राईम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली तेव्हा तिने सांगितले की तिचा आणि तिच्या पतीमधील प्रणय सासरच्यांनी सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड केले होते. हे व्हिडीओ नंतर एका एका वेबसाइटवर अपलोड करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांना तक्रारदार महिलेच्या म्हणण्यावर विश्वास बसला नव्हता, मात्र जेव्हा त्यांनी तपास केला आणि महिलेच्या बेडरूमची झडती घेतली तेव्हा त्यांना बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे दिसून आले. या खोलीत त्यांना सेक्स टॉय आणि  फॅन्सी कपडेही सापडले होते. यानंतर तिन्ही आरोपींना अटक केली.

सासऱ्याने सेक्सचे प्रशिक्षण दिल्याचाही आरोप

विवाहितेने तिच्या सासरच्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. वेबसाईटवर अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी सासऱ्याने आपल्याला जबरदस्तीने सेक्स कसा करावा याचे प्रशिक्षण दिले होते असे या महिलेने म्हटले आहे. एका हॉटेलमध्ये नेऊन परदेशी तरुणींना बोलावून शरीरसंबंध कसा ठेवायचा याचा डेमो आपल्याला दाखवण्यात आला होता असं या महिलेने म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून सोशल वेबसाईटवर अपलोड केलेले पीडितेचे व्हिडिओ डिलीट व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.