आहारातील फॅट्स…चांगले की वाईट? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरीरात जमा होणारा आणि डाएट करणाऱ्यांची डोकेदुखी ठरणारा घटक म्हणजे फॅट्स. शरीरात अनेक प्रकारचे फॅट्स जमा होत असतात. पण, सगळेच फॅट्स हे हानिकारकच असतातच असे नाही नाही. त्यातही चांगले आणि वाईट अशा दोन प्रकारचे फॅट्स पहायला मिळतात. याविषयी अपोलो स्पेक्ट्राचे आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

शरीराचे कार्य सुरळीत राहण्यासाठी आपल्या शरीराला चरबीची आवश्यकता असते. तुमची त्वचा, अवयव आणि अंतःस्रावी प्रणाली (जे हार्मोन्स तयार करते आणि नियंत्रित करते) यांचे आरोग्य चांगले राखण्याकरिका तुमच्या आहारात निरोगी फॅट्स समाविष्ट करणे आवश्यक असते. तुम्ही योग्य आहार घेत आहात की नाही, हे प्रामुख्याने तुम्‍ही जे फॅट खाता त्यावर अवलंबून असते.

फॅट्सचे तीन मुख्य प्रकार
सॅच्युरेटेड फॅट्स
अनसॅच्युरेटेड फॅट्स
ट्रान्स फॅट्स

फॅट्सचे विविध आरोग्यावर परिणाम त्यांच्या रासायनिक मेकअपमधील या फरकांमुळे होतात. कमी प्रमाणात चरबी ही सामान्यतः समस्या नसतात, परंतु भरपूर प्रमाणात सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅट्सचे सेवन करणे हे सामान्यतः आरोग्यदायी असल्याचे दिसून येते. ट्रान्स फॅटचा तुमचा दैनंदिन वापर शक्य तितका मर्यादित करण्याचा प्रयत्न करा.

1. हायड्रोजनेटेड तेल असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन टाळावे (जसे की कुकीज, तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ). जरी त्यांना “ट्रान्स-फॅट-फ्री” म्हणत असले तरीही त्यांच्यात काही प्रमाणात ट्रान्स फॅट असते.

2. मटणामध्ये सॅच्युरेटेड फॅट (Saturated Fat) असते जे कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यास जबाबदार असते. मांस, प्रक्रिया केलेले मांस, लिव्हर आणि डुकराचे मांस या सॅच्युरेटेड फॅट भरपूर असते. ज्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढते.

3.लोण्यामध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते. लोण्याच्या एक चमच्यात 7 ग्रॅम ते 14 ग्रॅमपेक्षा जास्त सॅच्युरेटेड फॅट आढळतात.

4. सध्या, ट्रान्स फॅट जवळजवळ सर्व तळलेले आणि फास्ट फुड्समध्ये दिसून येते. काही रेस्टॉरंट हे नॉन-हायड्रोजनेटेड किंवा ट्रान्स-फॅट-फ्री तेलात जेवण बनवतात. पण हे लक्षात ठेवा की तळलेले पदार्थ कमी असलेला आहार हा हृदयासाठी अनुकूल आहे. त्याने तुमची चयापचय क्षमता वाढवून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता.