फक्त 1 रुपया डाऊन पेमेंटमध्ये मिळवा बाईकचा आनंद, या बँकेची खास ऑफर

सणांच्या काळात जर तुम्हाला बाईक आणि स्कूटी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता 1 रुपयाचे पेमेंट करून टू-व्हीलर खरेदी करू शकतात. या स्कीम विषयी थोडं सविस्तर जाणून घेऊ.

फेडरल बँकेने ग्राहकांसाठी डेबिट कार्ड EMI वर बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याची सुविधा दिली आहे. फेडरल बँकेचे कार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्याचा फायदा होईल.

हिरो मोटोकॉर्प, होंडा मोटर सायकल आणि TVS मोटरचे देशभरात 947 शोरुम्स आहेत. कोणत्याही शोरूम मधून 1 रुपयाच्या पेमेंटवर टूव्हीलर खरेदी करू शकाल.

बँकेच्या माहितीनुसार पेपर वर्क जरूरी नाही किंवा बँकेत जाण्याची गरजही नाही. ही संपूर्ण प्रक्रिया आहे. प्रोसेसिंग फी देखील भरावी लागणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. डेबिट कार्डचे EMI भरण्यासाठी बँकेच्या ग्राहकांना 3/6/9/12 महिन्यांचा पर्याय निवडू शकतात.

फेडरल बँकेचे ग्राहक ही सुविधा घेऊ शकणार नाहीत. याच्या अधिक माहितीसाठी ‘DC-स्पेस-EMI’ लिहून 56767662 वर SMS पाठवावा लागेल. ग्राहक ‘7812900900’ वर मिस्ड कॉल करू शकतात.

ग्राहकांना होंडा मोटर सायकल खरेदीवर फेस्टिवल ऑफर म्हणून 5 टक्के कॅशबॅक ऑफर देखील देऊ शकतील. यासाठी किमान खरेदी अमाऊंट 30000 रुपये झाले आहेत. एका कार्डवर कमाल 5000 रुपये कॅशबॅक मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या