
सामना ऑनलाईन । ब्रुमाना
उत्तम शारीरिक क्षमता, भारदस्त व्यक्तिमत्व आणि खाकीची जबर असे साधारण रुप पोलिसाचे आपल्याकडे असते. पोलिसांचे असे भारदार व्यक्तिमत्व पाहिले की नागरिकांच्या मनात आदर आणि भिती या दोन्ही भावना आपोआप निर्माण होतात. परंतु लेबनॉनमध्ये पर्यटकांना चालना देण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी ब्रुमाना शहरातील महापौरांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.
पर्यटकांच्या वर्दळीसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रुमाना शहरामध्ये पोलीस दलामध्ये महिलांची भरती करण्यात येणार असून या महिला पोलीस पारंपारिक वर्दीऐवजी मिनी शॉर्टमध्ये दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शहरातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी म्हणून महापौरांनी ही नवीन शक्कल लढवली आहे. त्यामुळे सध्या ब्रमाना सिटीच्या रस्त्यावर काळ्या रंगाच्या मिनी शॉर्टसमध्ये महिला पोलीस गस्ती घालताना दिसून येत आहेत.
#Beirut:Lebanese city puts female officers in tiny shorts to attract tourists.
Young,attractive #PoliceWomen in #MiniShorts n #RedBerets R patrolling the streets in the #Lebanon town of #Broummana as part of its mayor’s plan to attract more #tourists &improve the country’s image. pic.twitter.com/t3VBqv9rWb— joydeep ROY (@IjoydeepRoy) June 24, 2018


























































