
इस्लाम धर्माची जगासमोर असलेली प्रतिमा बदलण्याचा जोरदार प्रयत्न फिफा वर्ल्ड कप दरम्यान कतार करत आहे. विशेष म्हणजे फुटबॉल स्पर्धेदरम्यान अनेक मुस्लीम धर्मगुरू भाषण देताना दिसत आहेत. त्यामुळे फिफा वर्ल्ड कपच्या निमित्ताने इस्लाम धर्माचा प्रचार केला जात असल्याचे समोर आले आहे.
वर्ल्ड कपचा थरार पाहण्यासाठी आलेल्या लाखो चाहत्यांना धर्मांतरणासाठी प्रेरित केले जात असून मशिदींना जास्तीत पर्यटक भेट कसे देतील, हे पाहिले जात आहे. नैसर्गिक वायूने संपन्न असलेला कतार फिफा वर्ल्ड कपचे आयोजन करणारा पहिलाच अरब देश आहे. याचा लाभ कतार घेत असून मुस्लीम धर्माबद्दल युरोपियन आणि अमेरिकन लोकांमध्ये असलेली समजूत मिटविण्याचे प्रयत्न विविध मार्गांनी केले जात आहेत.



























































