सोलापूर ड्रग्ज फॅक्टरी प्रकरण; पाचवा आरोपी जाळय़ात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त केल्यानंतरही त्या प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरूच आहे. गुन्हे शाखा युनिट-9 च्या पथकाने मोठे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर आता पाचवा ड्रग्जमाफियाला गजाआड केले. राजू गौड असे त्याचे नाव असून एमडी बनविण्यासाठी त्याने लाखो रुपये गुंतवले होते.

एसीपी महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने आता या प्रकरणातील पाचवा आरोपी रामागौड इदागी ऊर्फ राजू गौड या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तेलंगणाचा रहिवासी असलेला राजू हा त्या पंपनीच्या संचालकांपैकी एक असून त्याने एमडी बनविण्यासाठी या पंपनीत 60 लाखांहून अधिकची रक्कम गुंतवली आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दया नायक व त्यांच्या पथकाने राहुल आणि अतुल गवळी या दोघा भावांना एमडी ड्रग्जसह रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्या दोघा भावांनी सोलापूर एमआयडीसीत श्री शेंकी केमिकल्स प्रा. लि. या नावाने फॅक्टरी थाटून तेथे छुप्या पद्धतीने एमडी बनविण्याचा कारभार सुरू होता.