
सामना ऑनलाईन । रायबरेली
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात आज रायबरेलीत त्यांचे जंगी स्वागत होत असताना संध्याकाळी साडेसात वाजता ‘हिंदू युवा वाहिनी’चे कार्यकर्ते तिथे जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भिडले.
रायबरेलीत प्रियंका गांधी त्यांच्या स्वागतासाठी हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यांची घोषणाबाजी सुरू होती. त्याच वेळी तिथून ‘हिंदू युवा वाहिनी’चे कार्यकर्ते निघाले. मग काँग्रेस आणि हिंदू युवा वाहिनी यांच्यात घोषणायुद्ध जुंपले. त्यानंतर हाणामारी झाली
























































