
दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सुरु झाल्यानंतर ती दिल्लीकरांसाठी प्रवासाचे उत्तम साधन बनली आहे. जलद, वेगवान प्रवासासाठी उभारण्यात आलेल्या मेट्रोमध्ये आता गर्दी वाढायला लागली आहे. गर्दी वाढायला लागल्याने सीटवरून जवळपास रोज भांडणे व्हायला लागली असून प्रवाशांमध्ये सीटवरून हाणामारी व्हायला लागली आहे.
दिल्ली मेट्रो ही सुरू झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेली आहे. कधी जोडप्यांचा किस करतानाच व्हिडीओ व्हायरल झाल्याने, महिलांची भांडणामुळे, बिकीनी घालून फिरणाऱ्या तरुणीमुळे, मेट्रोमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणामुळे अशा चित्रविचित्र घटनांमुळे दिल्ली मेट्रो चर्चेचा विषय बनलेली आहे. दिल्ली मेट्रोतला हल्लीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळे दिल्ली मेट्रोची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.
मेट्रोने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांमध्ये सीटवरुन तुंबळ हाणामारी झाली. दोघांनी एकमेकांच्या कानाखाली मारल्या, लाथा झाडल्या आणि बुक्के मारले. आपला राग एकमेकांवर काढत असताना इतर प्रवाशांनी त्यांचा व्हिडीओ काढला. हे दोन प्रवासी एकमेकांना तुडवत असताना काहींनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी त्यांच्या मारामारीचा लांब बसून आनंद घेणं पसंत केले.
Kalesh b/w Two man inside Delhi metro over Push and Shove for seat
pic.twitter.com/Ih4x5TSRMY— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 4, 2023
मारामारी करणाऱ्या प्रवाशांपैकी एकजण उंच असल्याने त्याने दुसऱ्या प्रवाशाची कॉलर धरली होती तर दुसरा प्रवासी कमी उंचीचा फायदा घेत या उंच प्रवाशाला बुक्के हाणत होता. दोघे ताकडीने एकमेकांशी मारामारी करत होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातल्या एकाने प्रश्न विचारला की अॅनिमल सिनेमा पाहून आलेत का ?



























































