Fighter – हृतिक-दीपिकाच्या रोमान्सला हॉटनेसचा तडका, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“फायटर” हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी त्या चित्रपटातील इश्क जैसा कुछ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. हृतिक आणि दीपिका ही हटके जोडी प्रथमच या निमित्ताने पडद्यावर झळकली आहे.

या गाण्यात दीपिका आणि हृतिकच्या रोमान्सला हॉटनेसचा तडका लागला आहे. पठाण या चित्रपटाप्रमाणेच दीपिकाने या गाण्यात बिकीनी आणि स्विमसूट घातले आहेत. तसंच, सिक्स पॅक अॅब्जमध्ये पिळदार शरीर कमावलेला हृतिकही देखणा दिसत असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.

हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. फायटर या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत आणि 25 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे.