कोंबडी पळाली ….वादावादी जुंपली… दोन भावांनी वृद्धाला झोडपत घशात घातले दात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नवनाथ शिंदे

कोंबडीवरुन भांडणे सुरू होऊन वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाल्याची घटना विचित्र घटना जुन्नरमध्ये घडली आहे. जुन्नर तालुक्यातील घंगाळदरे गावात एका दुचाकीने कोंबडीला जखमी कोंबडीच्या मालकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचा राग आल्यामुळे शेजारच्या दोन भावडांनी जेष्ठ दाम्पत्याला मारहाण करुन त्यांचे दात पाडले आहेत. त्यामुळे जुन्नर तालुक्यात वादाला सुरुवात झालेल्या या कोंबडीची चर्चा पारावर रंगली आहे.

ही घटना शनिवारी घडली आहे. याप्रकरणी दत्तात्रय दुंदा तळपे आणि बबन दुंदा तळपे (दोघेही रा. घंगाळदरे, जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी मारुती नामदेव तळपे (वय 56, रा. घंगाळदरे, जुन्नर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मारुती यांच्या कोंबडा शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आरवला. त्यामुळे त्यांच्या पत्नी शांताबाईने खुराड्यातील कोंबडा-कोंबडीला बाहेर सोडले. मात्र, घर रस्त्यालगतच असल्यामुळे एका दुचाकीची कोंबडीला धडक बसली. त्यात ती जखमी झाली. त्यामुळे रागाच्या भरात मारुती घराबाहेर येऊन शिवीगाळ करु लागले. त्यांची शिवीगाळ ऐकून त्यांच्या घराशेजारी राहणारे दोन भाऊ बाहेर आले.

कोणाला शिवीगाळ करत आहात, असे त्या दोघांनी मारुती यांना विचारले. तुला जास्त माज आला आहे का, असेही ते म्हणाले. तुम्हाला शिवागाळ करत नसल्याचे मारुती यांनी त्या दोघांना सांगितले. त्याचा राग आल्यामुळे दोन भावडांनी मारूती यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांची पत्नी शांताबाई भांडण सोडविण्यासाठी आली असता, त्यांनाही त्या दोघांनी ढकलून दिले. त्यानंतर दोघा भावडांनी मारुती यांच्या तोंडावर बुक्का मारुन त्यांचे दोन दात पाडले आहेत.

दुचाकीने कोंबडीला धडक दिल्यामुळे तक्रारदार शिवीगाळ करीत होते. त्यावेळी तळपे भावडांनी त्यांना मारहाण केली आहे. आरोपींना लवकरच ताब्यात घेणार आहे.
-युवराज मोहिते, पोलीस निरीक्षक, जुन्नर पोलीस ठाणे