अबुंलग्यात विहिरीच्या पाणी वाटपावरुन दोन गटात तुबंळ हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नांदेड

मुक्रमाबाद पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या अबुंलगा येथील अंकुश सायलू ग्राम पंचायत सदस्य (वय 35) मंगळवारी गावात टॅंकरने आलेले विहिरीचे पाणी वाटप करत असताना गावातील गगांधर दिगंबर पाटील यांनी लोकांना घागरीने पाणी भरु दे, टँकरने वाटप करू नकोस, हे काम सरपंचाचे आहे, असे सांगितले. पाणी वाटपच्या शुल्लक कारणाने अंबुलगा गावातील गंगाधर पाटील,बालाजी झाडे,शंकर झाडे,शिवकुमार झाडे,ज्ञानेश्वर झाडे, साईनाथ झाडे,बबलु झिडे,शैलेश झाडे यांच्यासह जमावाने अंकुश सायलु यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या घराचे पत्रे काडण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार अंकुश सायलु यांनी मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार सर्व अरोपीवर गुन्हे नोंद करण्यात आले. पुढील तपास मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील नाईक करत आहेत.

गंगाधर पाटील (वय 47) मंगळवारी आपल्या घरासमोर बसले असता अंकुश सायलु ,संजय अकुलवाड, बालाजी अकुलवाड, माधव देशटवाड, संतोष मांजरमे, हरी देशटवाड, माणिक देशटवाड, यादव अकुलवाड, शाम अकुलवाड, हांणमत मांजरमे, मारोती अकुलवाड, हांणमत देशटवाड, मोईन कुरेशी यांनी जमावाने येत गंगाधर पाटील यांना तू आम्हाला पाणी टँकरने घेउन जाऊ देत नाहीस, तुझ्यात दम आहे तर रोखून दाखव असे बजावत बेदम मारहाण केली. पाटील यांच्या तक्रारीनुसार दोन गटातील 21 अरोपींवर मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. पुढील तपास बी.एम खेडकर करत आहेत.