
सामना प्रतिनिधी । जुन्नर
जुन्नर तालुक्यातील काले तांबे येथे शेतमालाला भाव नसल्यामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे तानाजी सिताराम मिंढे वय वर्ष ४० या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जुन्नर प. समिती गटनेते दिलीपशेठ गांजाळे यांनी ग्रामस्थांसोबत भेट दिली व आर्थिक मदत केली.
































































