
सामना ऑनलाईन । मुंबई
मालाड पश्चिमेतील सोमवार बाजार परिसरात बॉम्बे टॉकीज जवळील एका इमारतीला आग लागल्याचे वृत्त आहे.अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दल्याच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
या इमारतीत असलेल्या लाकडाच्या गोदामाला ही आग लागल्यची माहिती मिळत आहे. हा परिसर औद्योगिक परिसर असून या ठिकाणी लाकडाची अनेक गोदामे आहेत. हा परिसर चिंचोळा असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. आगीचे प्रमाण मोठे असल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
#SpotVisuals: Fire has broken out in Somwari Bazar area of Malad West, in Mumbai. 8 fire tenders have rushed to the spot. Fire fighting operations are underway. More details awaited. pic.twitter.com/OAZcIspJjU
— ANI (@ANI) September 4, 2018


























































