भिवंडीत गोदामाला भीषण आग, सात-आठ गोदामं जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire-broke-out bhiwandi

सामना प्रतिनिधी । ठाणे

भिवंडीत गोदामात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून सात ते आठ गोदामे भस्मसात झाली आहेत. आग विझविण्यासाठी भिवंडी कल्याण, ठाणे, उल्हासनगर एमआयडीसीच्या अग्निशामक गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पाण्याची कमतरता भासत असल्याने आग विझविण्यात प्रचंड अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.