सामना प्रतिनिधी । वांद्रे
वांद्रे पश्चिम येथील जामा मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या शास्त्री नगर परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, ते कारण अद्याप कळू शकलेलं नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
































































