
अकरावीसाठी पहिली प्रवेश यादी आज, शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. यात पहिली गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयाच्या प्रवेशाचे कटऑफ गुण जाहीर केले जाणार असून, विद्यार्थ्यांना 3 जून 2026 पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी राज्यभरातून 12 लाख 49 हजार 506 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 9 लाख 4 हजार 189 विद्यार्थ्यांनी अर्जाचे दोन्ही भाग भरले आहेत, तर अर्जनिश्चिती न केल्यामुळे तब्बल 3 लाख 45 हजार 317 विद्यार्थी पहिल्या फेरीपासून वंचित राहणार आहेत. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीपासून संधी मिळणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता या यादीकडे लागले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या फेरीसाठी तब्बल 12 लाख 49 हजार 506 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 1 लाख 8 हजार 447 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 1 पूर्ण भरला आहे. त्यातील 9 लाख 4 हजार 189 विद्यार्थ्यांनी अर्जाचे दोन्ही भाग भरले आहेत. अकरावीसाठी मुंबई विभागातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. मुंबई विभागातून 2 लाख 69 हजार 542 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 2 लाख 16 हजार 985 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत.
सहा दिवसांत प्रवेश निश्चित करा
उद्या, यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अवघ्या सहा दिवसांत प्रवेश निश्चित करावा लागेल. 29 मे ते 3 जून या कालावधीत प्रवेश निश्चित करण्याची वेळ देण्यात आली आहे. 4 जूनला कनिष्ठ महाविद्यालयांचे कामकाज पूर्ण होईल. 5 आणि 6 जूनला डेटा प्रक्रिया केली जाईल. तर 6 जूनला रात्री 10 वाजता दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाईल.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
विद्यार्थी, पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिपृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा ई-मेलवर संपर्प साधावा. विद्यार्थ्यांना 8530955564 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्प साधावा. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत अधिपृत संकेतस्थळावरून माहिती घेण्याचे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी मदत पेंद्रे आणि मदतवाहिनीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इनहाऊस कोटय़ात 42 हजार 635 अर्ज लॉक
राज्यातील एपूण नोंदणीपृत विद्यार्थ्यांपैकी 10 लाख 55 हजार 936 विद्यार्थ्यांनी शुल्क भरले असून, त्यातील 9 लाख 4 हजार 189 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश फेरीसाठी अर्ज लॉक केले आहेत. अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इनहाऊस कोटय़ांतर्गतही मोठय़ा प्रमाणावर अर्ज लॉक करण्यात आले आहेत. अल्पसंख्याक कोटय़ात 42 हजारांहून अधिक, तर इनहाऊस कोटय़ात 42 हजार 635 अर्ज लॉक झाले आहेत. मुंबई विभागातच अल्पसंख्याक कोटय़ातील 17 हजारांहून अधिक अर्ज लॉक झाल्याने शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांवरील दबाव कायम असल्याचे चित्र आहे.


























































