
देशात वेस्ट नाईल तापाचे रुग्ण वाढू लागले असून आज केरळच्या त्रिशुर जिह्यात आज पहिला बळी गेला आहे. 17 मे पासून एका 47 वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. वेगवेगळ्या ठिकाणी उपचार केल्यानंतरही ताप कमी होत नसल्याने त्याला त्रिशुर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. गेल्या तीन वर्षातील वेस्ट नाईलचा केरळमधील पहिला बळी ठरला आहे. त्यामुळे केरळची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून सर्व ठिकाणची मच्छरांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याचे निर्देश दिल्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिले आहेत.



























































