
सामना प्रतिनिधी । धाराशीव
टाटा व कोयना धरणातील हक्काचे पाणी मिळणे, प्रत्येक तालुक्यातील पाणी आरक्षण मिळणे, कायमचा दुष्काळ हटविणे या व अन्य मागण्यांसाठी देशातील पहिले फोन आंदोलन 28 जानेवारीपासून जवळा ता. सांगोला येथून सुरू होत आहे. हक्काचे पाणी आम्हाला कधी देणार, असा सवाल जनतेने या आंदोलनात सहभागी होऊन मुख्यमंत्री कार्यालय व मुख्य सचिवांना विचारायचा आहे. या आंदोलनात धाराशीवसह मराठवाडय़ातील जनतेनेही सहभागी व्हावे असे आवाहन टाटा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.प्रफुल्ल कदम यांनी केले आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीत टाटा व कोयना धरणातील तब्बल 116 टीएमसी हक्काचे पाणी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ातील दुष्काळी भागाला देण्याबाबत प्रा. प्रफुल्ल कदम यांनी यापूर्वीच मागणी अहवाल शासनाला सादर केला आहे. यासाठी अनेक वर्षांपासून त्यांनी आंदोलनेही केली आहे. या आंदोलनासंदर्भात प्रा. प्रफुल्ल कदम म्हणाले, टाटा व कोयना धरणातील पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते. वीजनिर्मितीनंतर हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. ते 166 टीएमसी पाणी आहे. हे पाणी भीमा नदीच्या तुटीच्या खोऱयाचे हक्काचे पाणी आहे. येथे दुष्काळी परिस्थिती असताना टाटा कंपनी वर्षानुवर्षे हे पाणी मोफत अडवून स्वतःच्या वीजनिर्मितीसाठी वापरते. तेच पाणी वापरणे बंद केले तर पश्चिम महाराष्ट्रातील व मराठवाडय़ातील दुष्काळी भागास शेती व पिण्यासाठी मिळू शकते. ते देण्याबाबत विचार सुरू आहे. पण यासाठी जनतेचा लढा तीव्र झाला तर शासन पातळीवर विचार होऊ शकतो.
या क्रमांकाकर फोन करा
वर्षा बंगला : (022) 23634950, 23650408, 23621313,
मुख्यमंत्री कार्यालय : (022) 22025151, 22025222, 22021850, 22020500, 22025073, 22020680, 22024550, 22023458, 22027171, 22022940, 22856129, 22029152, 22854166, 22024901,
मुख्य सचिव कार्यालय : (022) 22028762, 22025042.
हे फोन शासनाने बंद ठेवले तर आंदोलकांनी मुख्यमंत्री व मुख्य सचिवांचे नवे फोन नंबर शोधून फोन करण्याचे आवाहन केले आहे.
























































