2032चे ऑलिम्पिक यजमानपद हिंदुस्थानकडे? सगळ्याच देशांची टाईट फिल्डिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानने ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी याबाबत सांगताना म्हटले की, ऑलिम्पिकसारख्या मानाच्या स्पर्धेचे यजमानपद हिंदुस्थानला मिळावे यासाठी आम्ही गांभीर्याने विचार करीत असून याबाबतचे पत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीलाही देण्यात आले आहे.

2032 सालात होणाऱ्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी हिंदुस्थान उत्सुक आहे. 2032 सालामध्ये होणाऱ्य़ा ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी 2022 सालापासून बोली लावण्यात येणार आहे. त्यानंतर 2025 सालामध्ये ऑलिम्पिक यजमानपदाचे स्थळ निश्चित होणार आहे. हिंदुस्थानकडून मुंबई व दिल्ली या दोन शहरांना यजमानपदासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. हिंदुस्थान पहिल्यावहिल्या यजमानपदासाठी सज्ज होत असतानाच यावेळी इंडोनेशिया, चीन, कोरिया, ऑस्ट्रेलिया व जर्मनी हे देशही फिल्डिंग लावत आहेत. यामुळे हिंदुस्थानचा यजमानपदासाठीचा प्रवास नक्कीच सोप्पा नसणार आहे.olympic-2032