राज्यातील 54 हजार मच्छीमारांना 65 कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्यार व महाचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या राज्यातील मच्छिमारांसाठी राज्य सरकारने 65 कोटींहून अधिक रुपयांचे विशेष आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. त्याचा फायदा राज्यातील 54 हजार 573 मच्छिमारांना मिळणार आहे. त्याशिवाय निसर्गचक्रीवादळात नुकसान झालेल्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

राज्यात मागील वर्षी आँगस्ट महिन्यात मासेमारीचा हंगाम सुरु झाला होता. पण ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार व महा या दोन चक्रीवादळांमुळे मच्छिमारांना मासेमारी करता आली नाही. चक्रीवादळामुळे मासेमारी न करता मच्छिमारांना बोटी किनाऱयावर घेऊन यावे लागले. या काळात मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. खलाशांचे केतन, बर्फ, बोटीकरील अन्न-धान्याचा साठा व डिझेलवर खर्च झाला. वादळाच्या इशाऱयामुळे अनेक मच्छिमार घाईघाईने भरसमुद्रातून किनाऱयावर परत आले. त्यामुळे त्यांना समुद्रात सोडलेली जाळी परत किनाऱयावर आणता आली नाही. मासेमारीचा हंगाम फुकट गेल्याने आर्थिक मदत करण्याची मागणी लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती व मच्छिमार सहकारी संस्थांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिह्यातील मच्छिमारांसाठी 65 कोटी 17 लाख 20 हजार रुपयांचे विशेष आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. त याचा फायदा रापणवार संघाचे सभासद, बिगर यांत्रिक नौकाधारक, सिलेंडर नौकाधारक, लहानी मासळी विक्रेते व छोटो मच्छिमार अशा 54 हजार 573 लोकांना होईल.

प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी

या वर्षातील जून महिन्यातील निसर्गचक्रीवादळाचा फटका राज्यातील अनेक जिह्यांना बसला. या वादळात वेगनेगळ्या जिह्यातील प्राथमिक शाळांचे प्रचंड नुकसान झाले या जिह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मंजूर करण्याचा निर्णय राज्याच्या महसूल व वन विभागाने केला आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, पुणे नाशिक जिह्यातील 1 हजार 317 प्राथमिक शाळांची दुरुस्ती होईल.