पूरमुक्तीसाठी हिंदमाता येथे आणखी एक भूमिगत टाकी, 1.99 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 परळ येथील हिंदमाता भागाच्या पूरमुक्तीसाठी प्रमोद महाजन मैदानात आणखी एक भूमिगत टाकी बांधण्यात येत आहे. यात 1.99 कोटी लिटर पाणी साठवता येणार आहे. पुढील वर्षीपासून या टाकीचा उपयोग करता येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

मुंबईच्या पूरमुक्तीसाठी पालिका विविध उपाययोजना करीत आहे. यात भूमिगत टाक्यांचा प्रयोग यशस्वी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज अतिरिक्त आयुक्त पी. केलरासू यांनी पत्रकारांसोबत गांधी मार्केट, हिंदमाता या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रस्तावित कामांची माहितीही दिली. पालिकेने ‘ब्रिमस्टोकॅड – 2’ योजनेनुसार पूरमुक्तीसाठी उपाय सुरू केले आहेत. हिंदमाता येथे सेंट झेकियर्स मैदान आणि दादरमधील प्रमोद महाजन कला उद्यानाखाली भूमिगत साठकण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. हिंदमाता उड्डाणपुलाखाली 7 पंप बसवण्यात आले असून भूमिगत पाण्याच्या टाकीत जमा होणारे पाणी पंपाद्वारे समुद्रात सोडण्यात येते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हिंदमाता परिसर जलमय झाला नाही, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

असे झाले ‘हिंदमाता’चे काम

– हिंदमाता येथील सेंट झेकियर्स मैदानाखाली 1.05 कोटी लिटर आणि प्रमोद महाजन कला पार्क येथे 1.62 कोटी लिटर क्षमतेच्या साठकण टाक्या बसकिल्या जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे काम 2021मध्ये पूर्ण झाले. दुसऱया टप्प्यातील सेंट झेकियर्स मैदानाखालील 1.81 कोटी लिटर क्षमतेच्या साठकण टाकीचे काम पूर्ण होत आहे. या किस्तारित टाकीचा उपयोग यंदाच्या पाकसाळ्यात होत आहे.

गांधी मार्केटमध्ये मिनी पंपिंग स्टेशन

गांधी मार्केट येथे तयार करण्यात आलेल्या मिनी पंपिंग स्टेशनमुळे परिसराला आणि वाहतुकीलाही दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी चेंबर बनकून 1200 मि.मी. क्यासाची काहिनी टाकण्यात आली आहे. रस्त्याकर साचणारे पाणी चेंबरमध्ये साठवून त्याचा विसर्ग सहा उच्च क्षमतेच्या पंपांच्या माध्यमातून करण्यात येतो. हे सहा पंप 3 लाख लिटर पाणी प्रती मिनिट उपसतात. पालिकेच्या या कामामुळे गेल्या 45 वर्षांपासूनचा त्रास टळल्याचे स्थानिक दुकानदार हरिओम शुक्ला यांनी सांगितले.