गडनदी पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत

23

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

माखजन भागात तुफानी पाऊस कोसळत असल्याने गडनदीला पूर आले आहे. पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसले आहे. पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने व्यापारी जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. ईदवसभर पावसाच्या मुसळधार सरी आरवली माखजन भागात बरसत होत्या. यामुळे सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाले. सखल भागातील शेती पाण्याखाली गेली. शेतीत पाणी साचल्याने लावणीच्या कामात अडथळे निर्माण झाले. पावसाचा जोर कायम असल्याने आरवली माखजन अशा वाहणाऱ्या गडनदीला पूर आले. पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसू लागल्याने व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य अन्यत्र सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली. यासाठी व्यापाऱ्यांना ग्रामस्थांनीही मदत केली. पावसामुळे कुठेही हानी झाल्याची बातमी नाही.

आपली प्रतिक्रिया द्या