चारा घोटाळा प्रकरण, लालूंच्या शिक्षेचा आज फैसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्याशी संबंधित डोरंडा कोषागार प्रकरणात राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव व इतर 37 आरोपींना सीबीआयचे विशेष न्यायालय सोमवारी शिक्षा ठोठाकणार आहे. न्यायालयाने या प्रकरणात गेल्या आठकडय़ात लालूंसह एकूण 75 जणांना दोषी ठरवले होते. लालूंना 7 वर्षांपर्यंत तुरुंगकासाची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी हे सोमवारी शिक्षेचा निर्णय जाहीर करणार आहेत. यासंबंधी न्यायालयातील संपूर्ण प्रक्रिया क्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची तयारी पूर्ण केली आहे. लालूप्रसाद हे सध्या रिम्स रुग्णालयात असल्यामुळे त्यांच्यासाठी रिम्स रुग्णालयातील पेइंग वॉर्डमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची ववस्था केली आहे. शिक्षेची सुनावणी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. न्यायालयाने याआधी 35 दोषींना प्रत्येकी तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे.