
नोएडा आणि ग्रेटर नोएडातील आंदोलन आता शांत होत आहे. प्रशासनाच्या कडक भूमिकेनंतर आणि नवीन वेतनवाढीच्या घोषणेनंतर सुमारे 70 टक्के कामगार कामावर परतले आहेत. नोएडातील औद्योगिक वसाहतींतील जनजीवन हळूहळू पूर्ववत होत आहे. मात्र दोन दिवसांतील जाळपोळींमुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 25 गाड्यांचा काचा फोडण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटवण्यात येत आहे.


























































