
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील शिवधाम कॉम्प्लेक्सच्या ग्राउंडवर शिवधाम सेवा मंडळ आयोजित एसीई कप फुटबॉल स्पर्धेच्या थराराला आजपासून प्रारंभ झाला. 30 एप्रिलपर्यंत रंगणाऱया या स्पर्धेत एकूण 32 संघ खेळणार आहेत. सामन्यांचा थरार रंगणार आहे. आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे शानदार उद्घाटन आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी टीव्ही अँकर रोहिताश गौर, सुप्रिया लाइफ सायन्सचे संस्थापक सतीश वाघ उपस्थित होते. तसेच शाखाप्रमुख सुभाष धानुका, विकासक विनय जैन, युवासेना सहसचिव समृद्ध शिर्पे व खेळाडू आणि प्रेक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला रोख रुपये 50 हजार आाणि जेतेपदाचा करंडक दिला जाईल. तर उपविजेत्या संघाला 25 हजार रुपयांचे इनाम देऊन सन्मानीत केले जाईल. याव्यतिरिक्त अनेक वैयक्तिक बक्षिसेही दिली जाणार आहेत.
























































