
नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे घेण्यात येणारी स्क्रिनिंग टेस्ट (परदेशी विद्यार्थी पदवी परीक्षा) 18 जून रोजी नियोजित वेळेनुसार होणार असून या परीक्षेला स्थगिती देण्याची परदेशी विद्यार्थ्यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे.
परदेशातील विद्यार्थ्यांना हिंदुस्थानात वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असल्यास मेडिकल काऊन्सिल आणि स्क्रिनिंग टेस्ट 2002 च्या कायद्यानुसार अनिवार्य आहे. ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स वेल्फेअर फोरमच्या वतीने याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाला तसेच परीक्षेला आव्हान दिले होते. मात्र विद्यार्थ्यांची मोठी संख्या पाहता परीक्षेला स्थगिती देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने विद्यार्थ्यांची मागणी फेटाळून लावली.
























































