अब तक तेरी गालिया सुनी, आज तुझे पार्टी में लेना पड रहा है!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून धडपडणारी भाजप पार्टी आता ‘काँग्रेसयुक्त’ भारतीय जनता पार्टी झाली आहे. कारण गेल्या दहा वर्षांपासून ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेऊन स्वागत करावे लागत आहे. त्याचे झाले असे की, मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे माजी आमदार संजय शुक्ला नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले. भोपाळमधील भाजपच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या दररोज शिव्या ऐकणारे भाजपचे नेते आणि शुक्ला यांचे कट्टर विरोधक खुद्द पैलाश विजयवर्गीय यांनीच त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे संजय शुक्ला यांचे स्वागत करताना विजयवर्गीय यांनी आपल्या मनातली खल बोलूनही दाखवली. ते म्हणाले, ‘‘अब तक तेरी गालिया सुनी, आज तुझे पार्टी में लेना पड रहा है!’’