ओ. पनीरसेल्वम यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांना कोरानाची लागण झाली असून श्वसनाचा त्रास वाढल्याने शनिवारी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे एमजीएम रुग्णालयाने मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे. दरम्यान, पनीरसेल्वम लवकर ठणठणीत बरे होतील, अशी इच्छा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी व्यक्त केली आहे.