फोर्टमधील पुरातन वास्तू, पुतळे, प्याऊ होणार चकाचक, पालिका खर्च करणार 1 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईची ऐतिहासिक ओळख असणाऱ्या पुरातन वास्तू, पुतळे, कारंजे, प्याऊ आता पालिकेच्या माध्यमातून नियमितपणे स्वछता-देखभाल करून चकाचक ठेवले जाणार आहेत. यासाठी तीन वर्षांत 1 कोटी 9 लाख रुपये खर्च करणार आहे. शिवाय समाजकंटकांपासून या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षाही ठेवण्यात येणार आहे.

मुंबई शहर व उपनगरात अनेक पुरातन वास्तू असून फोर्ट विभागात अशा ऐतिहासिक वास्तूंची संख्या जास्त आहे. मुंबईत येणारे पर्यटक या वास्तूंची कलाकुसर व वैशिष्टय़पूर्ण बांधकामे पाहून आकर्षित होतात. दक्षिण मुंबईत प्रामुख्याने 100 वर्षांहून जुने कारंजे आणि प्याऊ आहेत. शिवाय मुंबई आणि हिंदुस्थानच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक जडणघडणीत महत्त्काचा वाटा असलेल्या ‘नायकां’चे पुतळेही आहेत. या वास्तू पर्यटकांच्याही आकर्षण असून पालिकेने अनेक जुन्या प्याऊ आणि पुतळ्याची दुरुस्ती करुन ते पुन्हा कार्यरत केले आहे. या वास्तूंची आता नियमित देखभाल ठेवली जाणार आहे. यासाठी पालिका तज्ञ कंपनीची नियुक्त करत आहे. तीन वर्षांसाठी हे कंत्राट असून पालिका या कामासाठी 1 कोटी 9 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

असे होणार काम

पुरातन वास्तूंच्या जतन-संवर्धनासाठी बाह्य भिंतीवर उगवणाऱ्या वनस्पती सातत्याने काढून शास्त्रीय पध्दतीने दगडी भिंती स्वच्छ करणे, दगडी भिंतीमधील सांधे योग्य पध्दतीने भरणे, हानी झालेल्या भागाची पुनःस्थापना करणे,परिसराची दैनंदिन सफाई, आवरणाचे सहामाही परीक्षण, परिसरात दिवाबत्तीची सोय ठेवणे, सुरक्षा करणे, तीन महिन्यांतून एकदा शास्त्रीय पध्दतीने सफाई, पाण्याची व्यवस्था अशी कामे करण्यात येणार आहे.

म्हणूनच घेतला निर्णय

z मुंबईतील दमट हकामान सतत ऊन पाऊस यामुळे प्याऊ, कारंजे आणि पुतळे यांच्याकर रासायनिक प्रक्रिया होते. यामुळे दगडांना बुरशी येणे, दगडाच्या खाचांमध्ये कनस्पती काढणे, कारंज्यातील पाणी दूषित होणे, लोखंडाकरील आकरण खराब होणे, दिकाबत्तीत बिघाड होणे, सुरक्षे अभाकी पुरातन कास्तूंचा गैरकापर होणे असे प्रकार घडतात. त्यामुळेच या कास्तूंची देखभाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.