भिवंडीतील व्यापार्‍याला लुटणार्‍या चौघांना  नगरमध्ये अटक

20

सामना प्रतिनिधी । नगर 

पारनेर तालुक्यातील धोत्रे शिवारात मुंबईतील व्यापार्‍याला लुटणार्‍या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. त्यात एका संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. तिघांच्या अटकेची कारवाई करून त्यांना पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये किशोर चव्हाण, किरण भोसले, साईनाथ काळे यांचा समावेश आहे.

रविवारी  गांगडें वस्ती, धोत्रे शिवार, ता. पारनेर येथे शिवनाथ गणेश भोईर, शाम बारक्या भोईर, करण आकाश भोईर, राजकुमार रतनचंद बुढाई हे बकर्‍या विकत घेण्याकरिता आले असताना 10 ते 12 अनोळखी आरोपींनी चार इसमांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांचेकडील 2 लाख 32 हजार रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने असा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता.

सदर घटनेबाबत पारनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त खबर्‍याकडून माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा करणारे काही आरोपी सुपा बस स्टँड जवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावर पोलिसांनी सुपा येथे जाऊन बस स्थानकाजवळ सापळा लावून तीन संशयितांना ताब्यात घेतले.

त्यातील एक बालक विधिसंघर्षग्रस्त होते. त्यांचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदार यांचे मदतीने केल्याची कबुली दिली. त्यापैकी एका साथीदार हा आता सध्या त्याच्या घरी आहे, अशी माहिती देऊन सदर आरोपीचे घर दाखविल्याने आणखी एका साथीदारास ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या