कोल्हापुरात मुंबईहून गावी परतणाऱ्य़ा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

file photo

मुंबईहुन मुळ गावी शाहूवाडीकडे येताना, दुचाकी घसरून कराड येथे झालेल्या अपघातात आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.तर एका वृद्ध महिलेने पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मूळचे जांबुर येथील सर्जेराव भीमराव पाटील (33) हे कामानिमित्त डोंबिवली येथील परिवारासह राहतात.कोरोनाच्या धास्तीने ते पत्नी पुनम (27) आणि मुलगा अभय (7) यांना दुचाकीवरून मंगळवारी रोजी गावी येत होते. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ त्यांची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा चारिटेबल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिघांचाही मृत्यू झाला. कोरोनाच्या धास्तीने तसेच रोजगारही नसल्याने,अनेक जण मिळेल त्या वाहनाने तसेच मैलोनमैल पायपीट मुळगावी जात आहेत. पाटील कुटुंबीयही आपल्या गावी येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघाताचा धक्का कुटुंबीयांना बसला असून,परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास हनुमान नगर, शिये येथे कसबा बावडाच्या हद्दीत पंचगंगा नदी काठावर मालुबाई आकाराम आवळे  या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला. कोरोनाच्या धास्तीनेच हा मृत्यू झाल्याची माहिती मुलगा बाळु आवळे यांनी दिली.  मालुबाई या मुलगा बाळु, सून आणि नातवंडांसह शिरोली औद्योगिक वसाहतीमधील खुशबू इंडस्ट्रीज येथे राहत होत्या.  मुलगा बाळू हा त्या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत असुन त्यांनी टोप येथील बिरदेव मंदिराच्या मागील बाजूस छोटे घर बांधले आहे. मुले मोठी असल्यामुळे ते आई आणि मुलांना कंपनीत ठेवत व स्वतः टोप येथील घरात झोपण्यासाठी जात होते. रविवारपासून शिरोली औद्योगिक वसाहत बंद असल्याने, मालुबाई नातवंडांना सातत्याने औद्योगिक वसाहतीमधील कारखाने का बंद आहेत याची विचारणा करत होत्या. यावेळी त्यांना कोरोना या संसर्गजन्य आजाराची माहिती मिळाली.

आपली प्रतिक्रिया द्या