Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’26 जून’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES -Tuesday, June 26, 2023)
लोकांबद्दल वाईट विचार करणे टाळा. चांगल्या लोकांशी जोडून राहाल. घरात समारंभाचे वातावरण असेल. स्वत:साठी खूप वेळ मिळेल. आवडते गाणे किंवा आवडते पुस्तक वाचण्यात वेळ जाईल. जोडीदारासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्याचा आनंद घ्याल. कोणासोबतही वादविवाद घालू नका. सकाळी तुळशीला पाणी घाला. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : पिवळा

वृषभ (TAURUS – Tuesday, June 26, 2023)
पारिजातकाला दोन तांदूळ आणि दोन साखरेचे दाणे घालून मनातील इच्छा व्यक्त करा. त्रिफळा पावडरचा वापर करा. नातेसंबंध नव्याने दृढ होतील. नवीन उद्योग, उपक्रमाकडे आकर्षित व्हाल. जोडीदाराचा मूड आज छान असेल. दिवसाची सुरुवात उत्साहपूर्ण असेल. स्वत:साठी वेळ काढाल. आर्थिकदृष्ट्या लाभदायक संधी मिळण्याची शक्यता आहे.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Tuesday, June 26, 2023)
लाल रंगाचे कपडे परिधान करा. पटकन रागावणे अडचणीत टाकू शकते. व्यर्थ खर्च करू नका. दिवसाचा उत्तरार्धात आराम करण्याला प्राधान्य द्या. कुटुंबियांसोबत मजेत वेळ जाईल. मर्यादा सोडून वागू नका. शिवपिंडीवर अभिषेक करून बेलपत्र वाहा. सामाजिक कार्यासाठी मदत कराल.
शुभरंग : किरमिजी

कर्क (CANCER – Tuesday, June 26, 2023)
प्राणीमात्रांवर दया करा. शारीरिक ऊर्जेकरिता विश्रांती घ्याल. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. अनोळखी व्यक्तिपासून सावध राहा. गुलाबाचे अत्तर घरात शिंपडा. मन मारून जगू नका. समाजात कौतुक होईल. बऱ्याच वर्षांची जुनी मैत्रिण अनपेक्षितपणे भेटेल. तुमच्या मदतीमुळे एखाद्याचे भले होऊ शकते.
शुभरंग : पिवळा

सिंह (LEO – Tuesday, June 26, 2023)
आजचा दिवस नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी लाभदायक आहे. आजार बरा व्हायला सुरुवात होईल. आर्थिक प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. घरातील जवळच्या व्यक्तिसोबत गप्पा मारण्यात वेळ जाईल. घराचे सुशोभिकरण कराल. सकाळी दारात रांगोळी काढा. सकारात्मक विचार करा. सूर्यनमस्कार करा. मानसिक शांतता मिळेल.
शुभरंग : पांढरा

कन्या (VIRGO – Tuesday, June 26, 2023)
चांदीचा तुकडा किंवा चांदीचा शिक्का खिशात ठेवा. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल. सकारात्मक विचारांमुळे समस्येशी दोन हात कराल. नातेवाईकाच्या घरी जाण्याचा योग आहे. कोणालाही आश्वासने देण्याच्या फंदात पडू नका. रोचक मॅगझिन वाचाल. आजचा दिवस चांगल्या पद्धतीने व्यतित कराल.
शुभरंग : मोती

तूळ (TULA- Tuesday, June 26, 2023)
वाडाच्या किंवा कडुलिंबाच्या झाडाला दूध वाहा. स्वत:कडची गुपितं कोणाकडेही उघड करू नका. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील. उतावीळपणे वागू नका. जोडीदारासोबत कोणत्याही भांडणाशिवाय आजचा दिवस शांत घालवाल. कार्यालयातून लवकर घरी जाल.
शुभरंग : चॉकलेटी

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, June 26, 2023)
एखादे रोपटे, वनस्पती किंवा झाडाची मुळे तोडू नका. निराशावादी राहू नका. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा संभवतो. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यात वेळ जाईल. सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करेल. कुटुंबियांसोबत वेळ जाईल. व्यवसायात नफा मिळेल. जोडीदार नव्याने तुमच्या प्रेमात पडेल.
शुभरंग : काळा

धनु (SAGITTARIUS – Tuesday, June 26, 2023)
नशिबावर हवाला ठेवून राहू नका. आरोग्याची काळजी घ्या. घरातील ज्येष्ठांना समजून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत घ्यावी लागेल. रिकामा वेळ छंद जोपासण्यासाठी घालवाल. जोडीदाराला त्याच्या आवडीचा पदार्थ खाऊ घाला. कार्यालयात नवीन संधी मिळेल. मारुतीरायाचे दर्शन घ्या.
शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN – Tuesday, June 26, 2023)
गाईला उकडलेले बटाटे हळदीची पावडर टाकून खाऊ घाला. प्रिय आणि आवडत्या व्यक्तिशी शालिनतेने वागाल. मोबाईल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू नका. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी व्हाल. हाताखालील कर्मचाऱ्यांची काळजी घ्याल. आवडत्या फुलझाडाचे रोपटे अंगणात लावा.
शुभरंग : सोनेरी

कुंभ (AQUARIUS – Tuesday, June 26, 2023)
सकाळी लवकर उठून कुटुंबातील मोठ्या व्यक्तिंचा आशीर्वाद घ्या. आळस झटकून कामाला लागा. मानधनाचा लाभ होईल. अनपेक्षितपणे भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कोणाचेही मन दुखवू नका. आजचा दिवस आयुष्यातील सुंदर दिवस असेल. कामात प्रगती कराल. सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Tuesday, June 26, 2023)
दिव्यांग, कुष्ठरोगी यांना उबदार रंगीबेरंगी कपडे वितरित करा. स्वास्थ्य उत्तम राहिल. अडलेली कामे पूर्ण होतील. प्रिय व्यक्तिसोबत झालेली भेट अतिशय आनंददायी आणि उत्साहवर्धक ठरेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. प्रवासाचा योग आहे. आजचा दिवस अतिशय आनंदात घालवाल.
शुभरंग : केशरी