
जगद्विख्यात बौद्ध धम्मगुरू महाथेरो अजाह्य जयासारो हे थायलंड येथून हिंदुस्थान भेटीसाठी आले असून त्यांनी विविध भिख्खू संघटनांना भेट दिली. त्यांच्या या भेटीदरम्यान मुंबईमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भिख्खू संघाला चिवरदान करण्यात आले.
महाथेरो अजाह्य जयासारो हे हिंदुस्थान भेटीवर आल्यानिमित्त नुकताच दादर येथील शिवाजी मंदिर नाटय़गृहात भिख्खू संघासाठी चिवरदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अखिल भारतीय भिख्खू संघ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात उपासक शुभ्र वस्त्र्ा परिधान करून मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन’तर्फे मोफत चिवर उपलब्ध करून देण्यात आले होते. याप्रसंगी ‘महाथेरो अजाह्य जयासारो’ यांच्या धम्मावर आधारित मराठी अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन ‘मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन’ या मुंबईस्थित ना नफा या तत्त्वावर चालणाऱया संस्थेने केले होते. या कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित राहिले होते. ज्येष्ठ सनदी अधिकारी हर्षदीप कांबळे, डॉक्टर विजय कदम व सहकाऱयांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.



























































