
सामना प्रतिनिधी । लातूर
बदलते हवामान आणि निसर्गाचा लहरीपणामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांना शेती करणे, पांरपारिक पिके घेणे अवघड होत चालले आहे. यावर मात करुन शाश्वत शेती करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या भागात येणाऱ्या आणि अधिक उत्पन्न देणारे फळ झाडाचे वाटप महादेव गोमारे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामध्ये भूसमुद्रगा, टाकळी जेवळी, नागझरी, आकरवाई व रायवाडी या गावातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रामुख्याने केशर आंबा, लखनौ पेरु, भाडोली जांभळ, साई सरबती लिंबू, एन एम के गोल्डन सीताफळ, ओडिसी शेवगा, चिंच, काली पत्ती, चिकू या प्रकारच्या फळ झाडांचे वाटप करण्यात आले. सोबतच शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले असून फळबागांमध्ये आंतरपीक घेऊन एकूण कमी क्षेत्रांमध्ये अधिक उत्पादन घेणे संबंधितचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. प्राकृतिक विद्यापीठ बाभळगाव येथे प्रशिक्षणही देण्यात आले.
शेतीतील उत्पादन खर्च कमी करुन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी या पध्दतीची रचना आर्ट ऑफ लिव्हींग माध्यमातून करण्यात आली आहे. फळ झाडांचे वाटप प्राकृतिक विद्यापीठ बाभळगाव या ठिकाणी करण्यात आले.



























































