गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले, गोयंकरांच्या खिशाला कात्री

सामना ऑनलाईन । पणजी

लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका संपल्यानंतर गोव्यात पेट्रोल-डिझेल महागल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. गोव्यात पेट्रोल 2.77 तर डिझेल 1.65 रुपयांनी महागले आहे. राज्य सरकारकडून पेट्रोलच्या मूल्यवर्धित करात 5 टक्के तर, डिझेलच्या मूल्यवर्धित करात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता गोव्यात पेट्रोलचा दर 66 रुपये 53 पैसे तर, डिझेल 64 रुपये 98 पैसे इतका झाला आहे.

राज्य सरकारकडून पेट्रोल व डिझेलच्या मूल्यवर्धित करात वाढ केल्यामुळे सरकारला दरमहा 12.5 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. तसेच वर्षाला सरकारच्या तिजोरीत जवळपास 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गोयंकरांच्या खिशाला कात्री लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या