
‘सारथी’ संस्थेच्या कोल्हापूर उपकेंद्रासाठी दोन कोटी 34 लाखांच्या प्रशासकीय खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे. या उपकेंद्रासाठी या निधीतून संरक्षक भिंत, मुख्य प्रवेशद्वार व अप्रोच रस्त्यांचे बांधकाम होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
शहरातील राजाराम कॉलेज परिसरातील (प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या मागील बाजूची जागा) पाच एकर जागा ‘सारथी’ उपकेंद्रासाठी देण्यात आली आहे. येथील प्रकल्पाच्या बांधकामाचे व संचालनाचे काम ‘सारथी’ संस्थेमार्फत करण्यास मान्यता दिली होती. ही बाब लक्षात घेऊन या उपकेंद्रासाठी दोन कोटी 34 लाख 57 हजार 790 रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये संरक्षक भिंत व मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी 38 लाख 55 हजार 708 व अप्रोच रस्त्यासाठी 96 लाख दोन हजार 82 रुपयांची तरतूद केल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.






























































