
अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज भरण्यास प्रत्यक्षात उद्या 30 मेपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करून अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे.
23 मेपासून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव केला. त्यानुसार उद्यापासून नव्याने लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करून विद्यार्थी नोंदणी करून प्रवेशअर्ज भरू शकतील. याचदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीची प्रक्रिया तसेच माहितीत दुरुस्तीदेखील करता येणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. अर्जाचा भाग 1 भरून पासवर्ड सेट केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व फेरीच्यावेळी अर्जाचा भाग 2 भरावा लागणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्ज प्रमाणित करून घ्यावा लागेल. तसेच ऑनलाइन नोंदणी शुल्क भरून अर्ज लॉक करता येईल.



























































